लक्ष्मी मुक्ती योजना
वाचा : शासन परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६१८१६/प्र.क्र. ४५८/ल-६, दिनांक १५ सप्टेंबर १९९२
कमलाकरने तलाठींकडे अर्ज देऊन, लक्ष्मी
मुक्ती योजनेअन्वये, स्वत:च्या पत्नीचे नाव, त्याच्या शेतजमिनीच्या
सात-बारा सदरी सहहिस्सेदार म्हणून दाखल करावे असा अर्ज दिला. तलाठी भाऊसाहेब
नवीन होते त्यामुळे लक्ष्मी मुक्ती योजनेबद्दल त्यांना माहिती नव्हती.
मंडलअधिकारी आल्यानंतर तलाठी
भाऊसाहेबांनी त्यांना लक्ष्मी मुक्ती योजनेबद्दल विचारणा केली.
मंडलअधिकार्यांनी खुलासा केला की,
स्त्रियांचे हक्क सुरक्षीत रहावे यादृष्टीने, काही सामाजिक संघटनांनी सुचविल्याप्रमाणे
शासनाने दिनांक १५ सप्टेंबर १९९२ रोजी शासन परिपत्रक क्रमांक
एस-१४/२१६१८१६/प्र.क्र.४५८/ल-६ अन्वये लक्ष्मी मुक्ती योजना लागू केली आहे.
या योजनेखाली, जर एखाद्या व्यक्तीने,
स्वेच्छेने, आपल्या स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीत, स्वत:च्या नावासोबत,
त्याच्या कायदेशीर पत्नीचे नाव, सहहिस्सेदार म्हणून दाखल करावे असा अर्ज दिला
तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदींचे पालन करुन, तसे नाव दाखल
करण्यास हरकत नाही.
त्यामुळे कमलाकरच्या अर्जाचा विचार
करण्यास काहीच हरकत नाही.
Comments