हिंदू विधवेच्या मिळकतीमध्ये दत्तक मुलाचा अधिकार
८०. हिंदू विधवेच्या मिळकतीमध्ये
दत्तक मुलाचा अधिकार :
वाचा : हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम, १९५६ ; हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम १४९.
रखमाबाईच्या पतीच्या निधनानंतर,
तिला तिच्या पतीची सर्व मालमत्ता उत्तराधिकाराधिकाराने प्राप्त झाली होती.
रखमाबाई निपुत्रिक असल्याने, तिने शेखरला दत्तक घेतले.
काही दिवसांनी रखमाबाईने तिच्या
मिळकतीचे वाटप केले आणि त्यातील हिस्सा शेखरच्या नावे केला.
वाटप
दस्ताची नोंदणीकृत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार
गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद करून सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.
एक दिवस रखमाबाईच्या मयत पतीचा भाऊ तलाठी
भाऊसाहेबांकडे आला आणि त्याने शेखरला मिळालेल्या हिस्स्याबाबत लेखी तक्रार
दाखल केली.
तलाठी भाऊसाहेबांनी त्याला
तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये नोंदवली.
मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले
तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली.
मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व
हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह
हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.
सुनावणीच्या दिवशी दोन्ही पक्षाचे
म्हणणे ऐकून मंडलअधिकार्यांनी निकाल दिला की,
'रखमाबाईच्या पतीच्या निधनानंतर,
रखमाबाईला उत्तराधिकाराधिकाराने प्राप्त झालेल्या तिच्या पतीच्या मालमत्तेची
ती हिंदू उत्तराधिकार अधिनियम,१९५६ कलम १४ अन्वये पूर्ण मालक झालेली आहे.
हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ अंमलात आल्यानंतर जर एखाद्या विधवा स्त्रिने, एखादा मुलगा दत्तक घेतला असेल तर त्या दत्तक मुलाला, विधवेला मिळालेल्या मिळकतीमध्ये कसलाही अधिकार प्राप्त होणार नाही अशी कायदेशीर तरतुद आहे. (केशरभाई जगन्नाथ गुजर वि. महाराष्ट्र सरकार आणि इतर ए.आय.आर. १९८१, मुंबई, ११५) त्यामुळे प्रतिवादीने, तिला उत्तराधिकाराधिकाराने प्राप्त झालेल्या मिळकतीत, तिच्या दत्तक मुलाला वाटपात हिस्सा देणे कायदेशीर होणार नाही.'
Comments