नागरी क्षेत्रात असलेल्‍या शेतजमिनीची खरेदी


 

नागरी क्षेत्रात असलेल्‍या शेतजमिनीची खरेदी

 

वाचा : भारतीय नोंदणी कायदा, कलम १७ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० ; महाराष्‍ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ४३-क.

 

कामराजने स्वत:च्या मालकी हक्काची, नागरी क्षेत्रात असलेली शेतजमीन विक्रमला विकली. या व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

तलाठी भाऊसाहेबांनी सर्व हितसंबंधीत हजर राहिल्यानंतर त्या सर्वांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घेतली. आणि कुळकायदा कलम ६३ नुसार विक्रमकडे शेतकरी पुराव्‍याची मागणी केली. विक्रम शेतकरी नसल्‍याने त्‍याच्‍याकडे शेतकरी पुरावा नव्‍हता. विक्रम गोंधळात पडला.    

योगायोगाने मंडलअधिकारी त्‍याच वेळेस चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी विक्रमकडे शेतकरी पुरावा नसल्‍याची बाब त्‍यांच्‍या निदर्शनास आणली.

मंडलअधिकारी यांनी सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले. आणि सांगितले की विक्रमने खरेदी केलेली जमीन ही महानगरपालिका क्षेत्रात असल्याने अशा जमिनीस कुळकायदा कलम ४३-क अन्‍वये कुळकायदा कलम ६३ च्या तरतुदी लागू होत नाहीत. त्यामुळे विक्रमकडे शेतकरी पुरावा मागण्याची आवश्यकता नाही. मुदत संपल्‍यानंतर फेरफार प्रमाणित करता येईल.

Comments

Archive

Contact Form

Send