रस्त्याच्या हक्काची खरेदी
३१.
रस्त्याच्या हक्काची खरेदी :
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६,
कलम १४९ व १५०.
वसंतरावांनी गावात शेतजमीन खरेदी केली
परंतु त्यांच्या शेतजमिनीला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांनी लगतच्या यशवंतरावांच्या
शेतातून स्वत:च्या
शेतजमिनीवर जाण्यासाठी रस्त्याचा हक्क नोंदणीकृत दस्ताने खरेदी केला.
सदर व्यवहाराची
नोंदणीकृत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद
घेतली. सर्व
हितसंबंधीतांना नोटीस बजावली.
रस्त्याचा विषय होता
म्हणून त्यांनी सहज गाव नकाशा बघीतला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की,
P गाव नकाशात एका
गावावरून दुसर्या गावास जाणारे रस्ते दोन भरीव रेषांनी दाखविले जातात. यांची
जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट नसते.
P
ग्रामीण गाडीमार्ग दोन तूटक रेषांनी दाखविले जातात. यांची जमीन भूमापन क्रमांकामध्ये पोटखराबा
सदराखाली समाविष्ट असते. आणि यांची रुंदी अंदाजे १६१/२ ते २१ फूट
असते.
P
पायमार्ग एक तूटक रेषेने दाखविले जातात. यांची जमीन भूमापन क्रमांकामध्ये पोटखराबा
सदराखाली समाविष्ट असते. यांची रुंदी अंदाजे ८१/४ फूट असते.
सर्व हितसंबंधीत हजर राहिल्यानंतर
तलाठी भाऊसाहेबांनी त्यांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घेतली. मुदत
कालावधी संपल्यानंतर मंडलअधिकारी यांनी सदर नोंद प्रमाणित केली.
तलाठी भाऊसाहेबांना प्रश्न होता की,
या खरेदी केलेल्या रस्त्याच्या क्षेत्राची नोंद कोणाच्या सात-बारा उतार्यावर
आणि कोठे करावी.
मंडलअधिकारी यांनी मार्गदर्शन केले की, सदरची नोंद ज्याच्या शेतजमिनीतून रस्ता जात आहे त्या यशवंतरावांच्या (खरेदी देणार) सात-बारा ‘इतर हक्कात’ नोंदवावी. त्यामुळे यापुढे सदर जमीन खरेदी घेणार्यास त्याबाबत माहिती मिळेल व भविष्यातील वाद टाळले जातील.
Comments