वरिष्‍ठ कार्यालयाच्या शेर्‍यावरून नोंद

 



३६. वरिष्‍ठ कार्यालयाच्या शेर्‍यावरून नोंद :

 

कायदा : फक्त वरिष्‍ठ कार्यालयाच्‍या शेर्‍यावरुन नोंद करणेबाबत कोणतीही कायदेशीर तरतुद नाही.

 

विठ्‍ठलरावांनी एकदा वरिष्‍ठ कार्यालयाकडे, अधिकार अभिलेखात नाव नोंदविण्यासाठी अधिकृत कागदपत्रांशिवाय अर्ज केला. वरिष्‍ठ कार्यालयाने नियमानुसार उचित कार्यवाही करावीअसा शेरा लिहुन तो अर्ज तलाठी कार्यालयात पाठवला.

तलाठी भाऊसाहेबांना कळत नव्‍हते की, अधिकृत कागदपत्रांशिवाय केलेल्‍या अर्जावर काय आणि कोणत्‍या कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाही करावी?

मंडलअधिकारी आल्‍यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी त्‍यांना पहिला प्रश्‍न विचारला की, नियमानुसार उचित कार्यवाही करावीअसा शेरा लिहून वरिष्‍ठ कार्यालयाकडून आलेल्‍या अर्जावर काय आणि कोणत्‍या कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाही करावी?

मंडलअधिकारी म्‍हणाले,

"अशा अर्जांवर कार्यवाही करण्‍यासाठी कोणतीही कायदेशीर तरतुद नाही. खरेतर अशा अर्जांना वरिष्‍ठ कार्यालय स्तरावरूनच उत्तर देण्यात यावे असे अपेक्षीत आहे.

काही वेळेस तलाठी अशा शेर्‍यांचा अर्थवरिष्‍ठ कार्यालयाकडील आदेशअसा चुकीचा अर्थ लावून त्यानुसार फेरफार नोंदही नोंदवतात. काही मंडलअधिकारीहीतहसिलदार कार्यालयाकडील आदेश पाहून नोंद मंजूरअसा शेरा ठेऊन नोंद प्रमाणीत करतात. ही काही ठिकाणी सर्रास वापरली जाणारी चुकीची आणि बेकायदेशीर पध्दत आहे.

नियमानुसार उचित कार्यवाही करावीअसा शेरा लिहून वरिष्‍ठ कार्यालयाकडून आलेल्‍या अर्जांबाबत, वरिष्‍ठ कार्यालयाशी चर्चा करण्‍यास काही तलाठी आणि मंडलअधिकार्‍यांच्‍या मनात भिती किंवा न्‍यूनगंड असतो.

खरेतर वरिष्‍ठ कार्यालयानेनियमानुसार उचित कार्यवाही करावीअसे मोघम शेरे लिहिणे बंद करावे. नियमानुसार कार्यवाही करण्याची असल्यास कोणत्या नियम व कलमानुसार कार्यवाही करावी याचा स्पष्ट उल्लेख करायला हवा.

तलाठी आणि मंडलअधिकारी यांनीसुध्‍दा वरिष्‍ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या कागदावरशेराआहे की तोआदेशआहे याची प्रथम खात्री करावी.

तलाठी यांनीनियमानुसार उचित कार्यवाही करावीअसे मोघम शेरे लिहून त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही प्रकारच्या अर्जावर/पत्रावरमा. महोदय, सदर अर्जावर/पत्रावर नेमकी काय व कोणत्या कायदेशीर तरतुदींन्वये कार्यवाही करावी याचा बोध होत नाही. कृपया स्पष्ट खुलासा/मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे.‘ असे लिहून तो अर्ज प्रेषकाकडे नम्रपणे परत पाठवावा. आपल्‍या कनिष्‍ठांना आवश्‍यकतेनुसार कायदेशीर मार्गदर्शन करणे हे वरिष्‍ठांचे कामच आहे आणि त्‍यासाठी ते नेहमीच तयार असतात. पण कनिष्‍ठांनी मनातील भिती किंवा न्‍यूनगंड दूर करून मार्गदर्शन विचारायला पाहिजे. कोणत्याही पत्राचा अर्थ लक्षात न घेता कोणतीही कार्यवाही करण्याचे टाळावे."

Comments

Emotions
Copy and paste emojis inside comment box

Archive

Contact Form

Send