फाजील वसूल

 


१००. 'फाजील वसूल' :

 

वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६

 

जमाबंदीच्‍या वेळेस फाजिल वसूली किती असा प्रश्‍न मंडल अधिकार्‍यांनी विचारताच सर्व नवीन तलाठी गोंधळून गेले. फाजिल वसूल हा शब्‍द ते पहिल्‍यांदाच ऐकत ते. सर्व तलाठ्‍यांच्‍या चहेर्‍यावरील प्रश्‍न चिन्‍ह बघून मंडल अधिकार्‍यांनी स्‍वत:च सांगायला सुरूवात केली. मंडलअधिकारी म्‍हणाले,

फाजील वसूल म्हणजे खातेदाराकडून वसूल केलेली जास्त रक्कम. उदाहरणार्थ एका खातेदाराचे एकूण येणे रुपये ६३/- आहे. यात रु. ७/- ऐन + रु. ४९/- जिल्हा परिषद उपकर (सात पट) + रु. ७/- ग्रामपंचायत उपकर (मूळ जमीन महसूल आकाराइतका) असे एकूण रु. ६३/- आहे.

आकाराची रक्‍कम अदा करतांना सदर खातेदाराने रु. ७०/- दिले. तर रु. ७०/- वजा रु. ६३/- = रु. ७/- हा फाजील वसूल झाला.

सदर फाजील वसूल (जादा वसूल) पुढील वर्षाच्या  गाव नमुना ८ब ला "जादा वसूली किंवा पुढील वर्षाकरिता वसुली" या स्तंभात (स्तंभ क्रमांक २४) लिहावा. याला फाजील वसूल मुरविणे असेही म्हणतात. पुढील वर्षी वसूल करतांना सदर खातेदाराकडून हे रु. ७/- कमी वसूल करावे.


Comments

Archive

Contact Form

Send