राज्य परिवहन महामंडाळाच्या जमिनीसाठी अकृषिक कर
७७. राज्य परिवहन महामंडाळाच्या
जमिनीसाठी अकृषिक कर :
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम १११, ११३ ; महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम १९६९ चा नियम २२(२ ; शासन परिपत्रक क्रमांक एलएए- ३९८६/८४(१५)/ल-२, दिनांक ९ मार्च १९८९.
तलाठी यांनी राज्य परिवहन
महामंडाळासाठी प्रदान केलेल्या जमिनीवर औद्योगिक आणि रहिवासी अशा दोन दराने अकृषिक
कर लावल्यामुळे राज्य परिवहन महामंडाळाचा अधिकारी चौकशीसाठी चावडीत आले होते.
तलाठी भाऊसाहेबांनी त्यांना शासन
परिपत्रक क्रमांक एलएए- ३९८६/८४(१५)/ल-२, दिनांक ९ मार्च १९८९ दाखवून सांगितले की,
राज्य परिवहन महामंडाळाकडील जी जमीन डेपो, वर्कशॉप, टायर रिट्रेडिंग प्लांट इत्यादी
औद्योगिक प्रयोजनांसाठी वापरली जाते त्यावर औद्योगिक दराने तर जी जमीन कामगार
कल्याण केंद्र, ग्रंथालय, हॉल आणि रहिवास इत्यादी अकृषिक प्रयोजनांसाठी वापरली
जाते त्यावर अकृषिक दराने कर लावण्याचे शासनाचे आदेश आहेत.
बस स्टँडखालील आणि रस्त्याखालील
जी जमीन जाती-धर्म किंवा अन्य काहीही भेदभाव न करता सर्वांसाठी खुली राहते त्याला
महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम १९६९ चा नियम
२२(२) अन्वये अकृषिक आकारणीतून सूट देण्यात आलेली आहे. नियमाप्रमाणे आपण बस स्टँडचा
जो ले-आऊट तहसिलदारांकडे सादर केलेला असेल त्याप्रमाणेच ही अकृषिक आकारणी करण्यात
येत आहे.
तलाठी भाऊसाहेबांच्या या खुलास्यामुळे राज्य परिवहन महामंडाळाच्या अधिकार्यांचे समाधान झाले.
Comments