महसूल संबंधित व्याख्या
''महसूल संबंधित व्याख्या''
मनोगत
महसूल
अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना अनेकदा टिपणी, अहवाल, निकाल किंवा
पत्राला उत्तर लिहितांना, एखाद्या शब्दाची
कायदेशीर व्याख्या नमूद करावी लागते. भिन्न भिन्न कायद्यांतर्गत काम करीत असतांना
अनेक व्याख्या आपण वाचतो त्यापैकी काही लक्षात राहतात तर काही व्याख्या
विसरल्या जातात. महसूल खात्यात अर्हता परीक्षा देतांना व्याख्यांचे महत्व
लक्षात येते.
आपण
अनेक कायदे राबवित असतो त्यामुळे प्रत्येक व्याख्या लक्षात राहिलच असे नाही.
कधीकधी एक व्याख्येचा कायदेशीर अर्थ जाणून घेण्यासाठी कायद्याची अनेक पुस्तके
चाळावी लागतात. कधीकधी व्याख्या लक्षात असते परंतु नेमक्या कोणत्या कायद्याखाली,
कोणत्या कलमान्वये ती व्याख्या दिलेली आहे हे आठवत नाही.
या सर्व गोष्टींचा विचार करून,
तातडीच्या वेळेला किंवा अर्हता परीक्षेचा अभ्यास करतांना, कोणती व्याख्या,
कोणत्या कायद्याखाली आणि कोणत्या कलमान्वये दिलेली आहे हे नेमके कळावे या दृष्टीकोनातून
"महसूल संबंधित
व्याख्या"ची रचना केलेली आहे.
यात विविध कायद्याखालील एकूण २०४ व्याख्या, कायदा व कलमांचा उल्लेख करून उपलब्ध
करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
विविध व्याख्या देतांना, शक्य
तिथे न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ दिलेला आहे. काही ठिकाणी तक्ते दिलेले आहेत. यामुळे
अभ्यास करतांना, कायदेशीर अथवा न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देऊन निकाल लिहिण्यास
किंवा एखाद्या अर्जाला उत्तर देण्यास मदत होईल.
"महसूल
संबंधित व्याख्या" महसूल खात्यातील सर्वच स्तरावरील अधिकारी/कर्मचार्यांसाठी
उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. "महसूल संबंधित व्याख्या"
मध्ये काही त्रुटी असण्याची
शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक तेथे अद्ययावत तरतुदींचा संदर्भ घ्यावा ही
विनंती.
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
मो. ९९२२९६८०५५
Comments