खरेदी घेणार मयत


 

खरेदी घेणार मयत

 

वाचा : भारतीय नोंदणी कायदा, कलम १७ ; मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ कलम ५४ हिंदू वारस कायदे.

 

हरिभाऊने त्‍याची स्‍वकष्‍टार्जित शेतजमीन एकनाथला विकत दिली. या व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. नोटीसची मुदत संपण्‍यापूर्वीच एकनाथ मयत झाला. तलाठी भाऊसाहेब अनुभवी होते, त्‍यांनी एकनाथच्‍या घरी निरोप पाठवून वारसासंबंधी कागदपत्रे प्राप्‍त करुन घेतली. गाव नमुना ६ क मध्ये वारस नोंद नोंदवली.

स्थानिक चौकशी केली आणि वारस ठराव मंजूर झाल्यावर त्या वारसांची नोंद गाव नमुना ६ मध्ये नोंदवली. त्‍यानंतर  सर्व हितसंबंधितांना सदर विक्री व्यवहाराची नोटीस बजावली.  

मुदत कालावधी संपल्‍यानंतर मंडलअधिकारी यांनी संबंधीत फेरफारवर निर्णय देण्‍याकामी कागदपत्रे पाहिली आणि कोणाचीही हरकत नसल्‍याची खात्री करुन खालील आशयाचा शेरा नोंदवून फेरफार नोंद प्रमाणित केली.

"मिळकतीत कायदेशीररित्या हक्‍क प्राप्‍त झाल्‍यानंतर जर एखादी व्यक्ती मयत झाली तरीही त्या व्यक्तीला कायदेशीररित्‍या प्राप्त झालेल्या हक्कांना बाधा येत नाही. त्‍यामुळे वारस ठरावानुसार नोंदविलेल्‍या मयत एकनाथच्‍या वारसांच्या नावे प्रमाणीत करण्‍यात येत आहे."


Comments

Archive

Contact Form

Send