बिगर शेतकरी व्यक्तीची औद्योगिक प्रयोजनासाठी शेतजमीन खरेदी
२८. बिगर शेतकरी व्यक्तीची औद्योगिक प्रयोजनासाठी
शेतजमीन खरेदी :
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५०; महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६३(१)(अ).
सुशील परमार या बिगर शेतकरी
असलेल्या व्यक्तीने औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन खरेदी केली. सदर व्यवहाराची
नोंदणीकृत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद
घेतली. सर्व
हितसंबंधीतांना नोटीस बजावली.
सुशील परमार हजर राहिल्यानंतर
तलाठी भाऊसाहेबांनी त्यांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घेतली आणि त्याच्याकडे
शेतकरी पुरावा मागितला तेव्हा त्याने तो शेतकरी नसल्याचे सांगितले.
तलाठी भाऊसाहेबांनी
मंडलअधिकार्यांना मार्गदर्शन विचारले. मंडलअधिकारी यांनी सुशील परमारकडे चौकशी
केल्यानंतर त्यांना कळले की सुशील परमार हा उद्योजक असून त्याचा एक कारखाना
शहरात आहे. दुसरा कारखाना स्थापन करण्यासाठी त्याने ही जमीन खरेदी केली आहे.
मंडलअधिकार्यांनी तलाठी
भाऊसाहेबांकडे खुलासा केला की, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६३(१)(अ) अन्वये खर्याखुर्या औद्योगिक
प्रयोजनासाठी किंवा विशेष वसाहत प्रकल्पासाठी जमीन खरेदी करणारी व्यक्ती शेतकरी असण्याची
किंवा त्याने अशा खरेदीसाठी कोणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नसते. त्याने
खरेदी घेतलेली जमीन नगर रचना अधिनियमान्वये प्रारुप किंवा अंतिम आराखड्यात किंवा
इतर कोणत्याही क्षेत्रात समाविष्ठ असली तरी हरकत नाही.
Comments