इतर राज्यातील शेतकर्याची महाराष्ट्रात जमीन खरेदी
२६. इतर राज्यातील शेतकर्याची महाराष्ट्रात
जमीन खरेदी :
वाचा : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६३.
मनजितसिंग या पंजाब राज्यातील
शेतकर्याने महाराष्ट्रात जमीन खरेदी केली. सदर व्यवहाराची नोंदणीकृत कागदपत्रे प्राप्त
झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस
बजावली.
सर्व हितसंबंधीत हजर राहिल्यानंतर
तलाठी भाऊसाहेबांनी त्यांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घेतली आणि
मनजितसिंगकडे शेतकरी पुरावा मागितला तेव्हा त्याने अमृतसर येथील त्याच्या
शेतजमिनीचा पुरावा सादर केला. परंतु त्याची खात्री कशी करावी हा प्रश्न होता.
तलाठी भाऊसाहेबांनी मंडलअधिकार्यांना मार्गदर्शन विचारले.
मंडलअधिकारी म्हणाले, मनजितसिंगने सादर
केलेला शेतकरी पुरावा, पत्रासह तहसिलदार कार्यालयात पाठवा. अमृतसर येथील संबंधीत जिल्ह्याच्या
जिल्हाधिकारी कार्यालयाशी तहसिलदार पत्राद्वारे संपर्क साधून या पुराव्याच्या खरेपणाबाबत
दाखला मागवतील. असा दाखला प्राप्त होईपर्यंत ही नोंद, तसा शेरा लिहून नोंद प्रलंबित
ठेवावी.
Comments