समान आडनाव असलेल्या वारसहीन खातेदाराची वारस नोंद
३३.
समान आडनाव असलेल्या वारसहीन खातेदाराची वारस नोंद :
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३४, १४९, १५०
महादेव दगडू पवार नावाचा खातेदार अविवाहित
मयत झाला अशी तोंडी बातमी तलाठी भाऊसाहेबांना कळली. सहज स्थानिक चौकशी केल्यावर
असे कळले की, मयत महादेवला हिंदू वारसा कायदा १९५६ अन्वये वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ आणि वर्ग ४ प्रमाणे
कोणीही वारस उपलब्ध नाहीत.
एक दिवस विष्णु दगडू पवार नावाच्या
व्यक्तीने, तो महादेव दगडू पवारचा भाऊ असून त्याच्या नावे वारस नोंद करावी असा
अर्ज आणि महादेव दगडू पवारचा मृत्युचा दाखला सादर केला.
तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना
६ क मध्ये नोंद घेतली. स्थानिक चौकशीत मयत महादेवला हिंदू वारसा कायदा १९५६ अन्वये
वर्ग १, वर्ग
२, वर्ग
३ आणि वर्ग ४ प्रमाणे कोणीही वारस नाहीत हे कळले होतेच. तलाठी भाऊसाहेब गोंधळात
पडले.
मंडलअधिकारी आल्यावर त्यांनी सर्व
परिस्थिती कथन केली. मंडलअधिकार्यांनी मार्गदर्शन केले की,
विष्णु दगडू पवारकडून तीन पिढ्यांची
वंशावळ प्रतिज्ञापत्रावर घ्या. रेशन कार्ड व इतर पुरावे उपलब्ध करून
घ्या. उपलब्ध कागदपत्रांचा अभ्यास करा.
वंशांवळीमध्ये नमूद सर्वांना बोलावून चौकशी करा. या चौकशीतून विष्णु दगडू पवार
विश्वासहार्य वारस नसल्याचे आढळून
आल्यास त्याला दिवाणी न्यायालयातून त्याचा वारस हक्क सिध्द करून आणण्यास सांगुन आणि
तसे नमूद करून वारस ठराव रद्द करण्यात येईल.
मयत खातेदारास कोणीही वारस नसल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३४ अन्वये कारवाई करता येते.
Comments