बँक बोजा असतांना जमिनीची विक्री
६७. बँक बोजा असतांना जमिनीची विक्री
:
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० ; शेतकर्यांना कर्ज देण्याबाबतचा अधिनियम १८८४
हंबीररावांनी स्वत:च्या शेतजमिनीवर
बॅंकेच्या कर्जाचा बोजा असतांना ती जमीन विश्वासरावांना विकत दिली.
या व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त
झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद करून सर्व हितसंबंधीतांना नोटीस
बजावली.
नोटीस मिळाल्यावर हंबीरराव आणि विश्वासरावांनी
नोटीस पुस्तकावर सही केली. नोटीस बजावूनही बँकेतर्फे कोणीही हजर राहिले नाही.
मुदत संपल्यानंतर मंडलअधिकार्यांनी
सदर नोंदीवर निर्णय घेण्यासाठी कागदपत्रे बघितली असता त्यांना आढळून आले की
खरेदी दस्तात विश्वासरावांनी बँकेचे कर्ज फेडण्याची जबाबदारी स्विकारली होती.
मंडलअधिकार्यांनी बॅंकेच्या
कर्जाचा बोजा आहे असे नमूद करून नोंद रद्द केली.
तलाठी भाऊसाहेबांनी कारण विचारल्यावर
मंडलअधिकार्यांनी उत्तर दिले की, हंबीररावांनी त्यांची जमीन बँकेला तारण देऊन
कर्ज काढले होते. त्यामुळे दुसर्याला तारण दिलेली मिळकत परस्पर विकणे हे
कायदेशीर नाही. जरी विश्वासरावांनी बँकेचे कर्ज फेडण्याची जबाबदारी स्विकारली असली
तरी याबाबत बँकेला कळविले नाही किंवा बँकेचा ना हरकत दाखला घेतलेला नाही. त्यामुळे
अशी नोंद प्रमाणित करणे बेकायदेशीर आहे.
बँकेचा प्रतिनिधी तक्रार करण्यासाठी
हजर नसतांनाही कायद्याचे पालन करुन नोंदीवर कायदेशीर निर्णय घेणार्या
मंडलअधिकार्याचे तलाठी भाऊसाहेबांना कौतूक वाटले.
Comments