विद्‍युत पुरवठा पोल उभारणी विरुध्‍द तक्रार

 


६६. विद्‍युत पुरवठा पोल उभारणी विरुध्‍द तक्रार :

 

वाचा : भारतीय विद्‍युत पुरवठा कायदा १९४८, कलम २२ ; भारतीय विद्‍युत नियमावली १९५६, नियम २९ ; टेलिग्राफ कायदा १९८५, कलम १० ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५०.

 

विद्‍युत पुरवठा कंपनीने अविनाशरावांच्‍या शेतात विद्‍युत पुरवठ्‍यासाठी पोल उभारणीच्‍या कामासाठी, वरिष्‍ठ कार्यालयाची परवानगी घेतली. त्‍या संबधीत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

नोटीस मिळाल्यावर अविनाशराव तलाठी भाऊसाहेबांकडे गेले आणि तोंडी हरकत दाखल केली.

योगायोगाने मंडलअधिकारी तेथेच होते. त्‍यांनी अविनाशरावांकडे चौकशी केली. तेव्‍हा अविनाशरावांनी तक्रार मांडली की, विद्‍युत पुरवठ्‍यासाठी पोल उभारणीमुळे माझ्‍या शेतातील पिक उत्‍पादनावर परिणाम होईल तसेच आमच्‍या जिवीताला धोका होऊ शकतो. काही क्षेत्रामध्‍ये मला पिक घेता येणार नाही. त्‍यामुळे मी या विरूध्‍द लेखी तक्रार दाखल करणार आहे.

मंडलअधिकार्‍यांनी अविनाशरावांना समजवले की,

विद्‍युत पुरवठा कंपनी स्‍वत:साठी तर अशी पोल उभारणी करत नाही. या पोल उभारणीमुळे गावात विद्‍युत पुरवठा सुरळीत होऊन गावाचा फायदाच होणार आहे. या समाज कार्यात तुमचेही योगदान नोंदविले जाईल.

विद्‍युत पुरवठ्‍यासाठी पोल उभारणीच्‍या कामासाठी त्‍यांनी वरिष्‍ठ कार्यालयाची परवानगी घेतली आहे त्‍यामुळे तुम्‍ही आमच्‍या स्‍तरावर तक्रार करुनही काही विशेष उपयोग होणार नाही.

भारतीय विद्‍युत नियमावली १९५६, नियम २९ अनुसार विज पुरवठ्‍याची सर्व उपकरणे, तारा या तांत्रिकदृष्‍ट्‍या योग्‍य क्षमतेच्‍या व संरक्षक तसेच भारतीय मानक संस्‍थेने दिलेल्‍या मानकाप्रमाणे असणे आवश्‍यक असते. त्‍यामुळे या पोल उभारणीमुळे तुमच्‍या जिवीताला धोका होण्‍याची शक्‍यता फार कमी आहे.

भारतीय विद्‍युत पुरवठा कायदा १९४८, कलम २२ अन्‍वये तसेच टेलिग्राफ कायदा १९८५, कलम १० अन्‍वये विद्‍युत पुरवठा करण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या कोणत्‍याही जागेत पोल उभारणे, ताण उभारणे, तारा ओढणे या गोष्‍टींची तरतुद असल्‍याने या गोष्‍टी कायदेशीर आहेत.

 

कोणत्‍याही शेत जमिनीतून विद्‍युतवाहिनी जात असेल तर त्‍या शेतात कोणतीही इमारत बांधतांना, ३३ के.व्‍हि. पुरवठा असल्‍यास, उभे अंतर १२ फूट आणि पुढील प्रत्‍येक ३३ के.व्‍हि. साठी एक फूट सोडावे लागते. आणि आडवे अंतर ११००० व्‍होल्‍ट दाबापर्यंत ४ फूट, ३३००० व्‍होल्‍ट दाबापर्यंत ६ फूट आणि ३३००० व्‍होल्‍ट दाबाकरिता ६ फूट अधिक १ फूट असे असते.

ज्‍या ठिकाणी विद्‍युतवाहिनीचा टॉवर उभारला जातो, त्‍या टॉवरखालील अंदाजे दिड ते दोन गुंठे जागेवर पिके घेता येत नाहीत. परंतु चर्चेंअंती विद्‍युत पुरवठा कंपनी अशा क्षेत्रासाठी नुकसान भरपाई देण्‍यास तयार असते.

या चर्चेनंतर अविनाशरावांना कळले की, आपण तक्रार करुन काहीही उपयोग होणार नाही त्‍यापेक्षा या समाजकार्यात आपलेही योगदान नोंदवावे हा उत्तम पर्याय आहे.                 


Comments

Emotions
Copy and paste emojis inside comment box

Archive

Contact Form

Send