पड जमिनीची खरेदी
५३. पड
जमिनीची खरेदी :
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० ; महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३.
विश्वनाथरावांनी त्यांची शेतजमीन,
त्यांच्या आर्थीक परिस्थितीमुळे अनेक वर्ष कोणतेही पीक न घेता पड ठेवली होती.
शेवटी त्यांनी ती जमीन शहरात राहणार्या अमितला विकली.
सदर
व्यवहाराची नोंदणीकृत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये
त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.
नोटीसीनुसार
विश्वनाथराव आणि अमित जेव्हा हजर झाले तेव्हा तलाठी भाऊसाहेबांनी अमितकडे
शेतकरी पुराव्याची मागणी केली. परंतु अमित शेतकरी नव्हता.
त्याचवेळेस
मंडलअधिकारी तेथे आले. तलाठी भाऊसाहेबांनी त्यांना सर्व हकीगत सांगितली. अमितचे
म्हणणे होते की विश्वनाथरावांची शेतजमीन अनेक वर्ष पड आहे त्यामुळे ती"
शेतजमीन" या संज्ञेत येत नाही आणि त्यामुळे बिगर शेतकरी व्यक्ती, ती जमीन
खरेदी करु शकतो.
मंडलअधिकार्यांनी
अमितला सांगितले की,
"कोणतीही
शेतजमीन जोपर्यंत कायदेशीरपणे अकृषीक होत नाही तो पर्यंत ती शेतजमीन या संज्ञेतच
येते. आणि कुळकायदा कलम ६३ अन्वये बिगर शेतकरी व्यक्ती, शेतजमीन खरेदी करु शकत
नाही. जमीन अनेक वर्ष पड आहे म्हणून ती आपोआप बिनशेती होत नाही."
अमितला
स्वत:ची चूक लक्षात आली.
Comments