घराची नोंद करण्‍याचा आग्रह

 


५२. घराची नोंद करण्‍याचा आग्रह :

 

वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०

 

गणेशने गावातील ग्रामपंचायत हद्‍दीत घर खरेदी केले. त्‍या खरेदीची कागदपत्रे घेऊन तो तलाठी भाऊसाहेबांकडे आला आणि त्‍या घराची नोंद महसूल दप्‍तरी करावी असा आग्रह केला.

तलाठी भाऊसाहेबांनी गणेशला सांगितले की, महसूल दप्‍तरात फक्‍त शेतजमिनीचीच नोंद करता येते. घराची नोंद करण्‍यासाठी तुम्‍हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागेल. जर तुमची शेतजमीन असती आणि त्‍यात तुम्‍ही शेतघर बांधले असते तर कदाचित मला त्‍याची नोंद तुमच्‍या सात-बारा सदरी नोंदविता आली असती. परंतु ग्रामपंचायत हद्‍दीतील घराची नोंद घेण्‍याचे अधिकार महसूल खात्‍याला नाही.

गणेशला तलाठी भाऊसाहेबांचे म्‍हणणे पटले आणि त्‍याने ग्रामपंचायत कार्यालयाचा रस्‍ता धरला.


Comments

Archive

Contact Form

Send