धर्मांतरित व्यक्तीचा वारसाधिकार
४८.
धर्मांतरित व्यक्तीचा वारसाधिकार :
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २६ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
प्रल्हादराव हे गावातील खातेदार मृत्यूपत्र
न करता मयत झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व एकत्र कुटुंबातील मिळकतीचे
कुटुंबियांमध्ये कायदेशीर नोंदणीकृत वाटप करण्यात आले. मयत प्रल्हादरावांच्या धर्मांतरित
मुलालाही वाटपामध्ये हिस्सा देण्यात
आला होता.
सदर नोंदणीकृत वाटपाची कागदपत्रे प्राप्त
झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस
बजावली.
नोटीस मिळाल्यावर प्रल्हादरावच्या
मुलीने प्रल्हादरावांच्या धर्मांतरित मुलाला वाटपामध्ये मिळालेल्या हिस्स्याबाबत लेखी हरकत दाखल केली. तलाठी भाऊसाहेबांनी
त्यांना तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली.
त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये
नोंदवली.
मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले
तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली.
मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व
हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह
हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.
सुनावणीच्या दिवशी प्रल्हादरावच्या
मुलीने हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २६ च्या तरतुदीचे पान दाखल केले ज्यानुसार,
'हिंदू वारसा कायदा १९५६ या अधिनियमाच्या प्रारंभानंतर,
एखादी व्यक्ती धर्मांतर केल्याने हिंदू
राहिली नसेल तर अशी व्यक्ती, धर्मांतरानंतर तिला झालेली आपत्ये व त्यांचे वारस एकत्र कुटुंबातील
संपत्तीत वारसाने अथवा उत्तराधिकाराने हिस्सा मिळण्यास अपात्र ठरतील.'
कायद्यातील तरतुद मंडलअधिकार्यांना
मान्य करावीच लागली.
Comments