वाटपात डावललेला हिस्‍सेदार

 


८४. वाटपात डावललेला हिस्‍सेदार :

 

वाचा : महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६,कलम ८५, १४९ व १५०; दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८, कलम ५४.  

 

कमलनाथच्‍या शेतमिनीचे नोंदणीकृत वाटप करण्‍यात आले. नोंदणीकृत वाटपाची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. कमलनाथच्‍या सर्वात लहान मुलाने, त्‍याचे नाव वाटपात डावलले गेले आहे अशी हरकत नोंदवून लेखी तक्रार दाखल केली.

तलाठी भाऊसाहेबांनी त्‍याला तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६ मध्ये नोंदवली.

मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्‍या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.

सुनावणीच्या दिवशी कमलनाथच्‍या सर्वात लहान मुलाने, त्‍याचे नाव वाटपात डावलले गेले आहे हे कागदोपत्री सिध्‍द केले.  

मंडलअधिकार्‍यांनी निकाल पत्रात नमूद केले की,

जेव्‍हा वाटपात एखादा सहहिस्‍सेदार वगळला गेला असतांना वाटपाला अंतिम स्‍वरूप दिले गेले तर ते वाटप शून्‍यनिय (Voidable) होते. त्‍यामुळे ते वाटप पुन्‍हा केले जाणे आवश्‍यक असते. (ए.आय.आर. १९८९, कर्नाटक १२०; ए.आय.आर. १९९९, मद्रास ७१) इतकेच नव्‍हे तर गर्भात मूल असेल आणि ते वाटपानंतर जन्‍मले तरी फेर वाटप केले जाते (ए.आय.आर.१९६४, ओरिसा ७५). त्‍यामुळे वादीचे म्‍हणणे मान्‍य करुन फेरफार नोंद रद्‍द करण्‍यात येत आहे.   


Comments

Archive

Contact Form

Send