आदिवासीच्‍या जमिनीची खरेदी

 


६९. आदिवासीच्‍या जमिनीची खरेदी :

 

वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३६

 

बबनरावांनी एका आदिवासी जमातीच्‍या व्‍यक्‍तीकडून, त्‍याच्‍या मालकीची असणारी शेतजमीन खरेदी केली. या व्‍यवहाराची संबधीत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

मुदत कालावधी संपल्‍यानंतर मंडलअधिकार्‍यांनी ती नोंद 'जमीन खरेदीसाठी जिल्‍हाधिकारी यांची परवानगी घेतलेली नाही' असा शेरा नोंदवून रद्‍द केली.

तलाठी भाऊसाहेबांनी कारण विचारल्‍यावर मंडलअधिकार्‍यांनी खुलासा केला की,

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३६ अन्‍वये आदिवासी जमातीच्‍या व्‍यक्‍तीकडून बिगर आदिवासी व्‍यक्‍तीला जिल्‍हाधिकारी यांच्‍या परवानगी शिवाय शेतजमीन खरेदी करता येत नाही. असे बेकायदेशीर हस्‍तांतरण झाल्‍यास, त्‍या आदिवासी जमातीच्‍या व्‍यक्‍तीकडून ३० वर्षाच्‍या आत जिल्‍हाधिकार्‍यांकडे अर्ज करुन ती जमीन परत मिळवता येते.

इतकेच नाही तर आदिवासी जमातीच्‍या व्‍यक्‍तीला पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी त्‍याची जमीन गहाण ठेवायची असल्‍यास जिल्‍हाधिकारी यांची परवानगी आवश्‍यक आहे. दिवाणी न्‍यायालयाच्‍या हुकूमाने सुध्‍दा आदिवासी जमातीच्‍या व्‍यक्‍तीच्‍या जमिनीचे हस्‍तांतरण होऊ शकत नाही.  

आदिवासी जमातीच्‍या व्‍यक्‍तीला पैशाची लालूच दाखवून, चिथावणी किंवा फसवणूक करून कोणी त्‍यांचा गैरफायदा घेऊ नये यासाठी हे संरक्षण दिलेले आहे.    


Comments

Archive

Contact Form

Send