पारसी धर्मीय दत्तक पुत्र

 


९२. पारसी धर्मीय दत्तक पुत्र :

 

वाचा : भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५, कलम ५० ते ५६ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५०.

 

जहांगिर नावाचा पारसी खातेदार मयत झाल्‍याबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना ६ क मध्ये नोंद घेतली. स्थानिक चौकशी केली. आणि वारस ठराव मंजूर झाल्‍यानंतर गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद करून सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

एक दिवस मयत जहांगिर यांनी दत्तक घेतलेला जफर नावाचा मुलगा तलाठी भाऊसाहेबांकडे आला आणि त्‍याने तोंडी तक्रार केली की, तो मयत जहांगिर यांचा दत्तक पुत्र असून, मयत जहांगिरच्‍या मिळकतीच्‍या वाटणीत त्‍याला हिस्‍सा न मिळाल्‍याने त्‍याची वारस नोंदीबाबत तक्रार होती.

तलाठी भाऊसाहेबांनी त्‍याला समजावून सांगितले की,

पारसी धर्मातमुलगाआणिमुलगीया संज्ञेत सावत्र किंवा दत्तक मुलगा किंवा मुलगी यांचा समावेश होत नाही. पारसी धर्मानुसार सावत्र मुलगा किंवा मुलगी म्हणजे त्या माता किंवा पित्याचे पूर्वी झालेल्या लग्नापासून झालेले आपत्य. अशा आपत्याला सावत्र माता किंवा सावत्र पित्याच्या मिळकतीत वारसा हक्क मिळत नाही. परंतु या संज्ञेत मयत मुलगा किंवा मुलगी यांचा समावेश असू शकतो.

 

दत्तकाबाबतही पारसी धर्मात काटेकोर नियम नाहीत. पारसी धर्मात अंत्यविधी करण्यासाठी दत्तक घेतले जाते. पारसी धर्मात दत्तक आपत्यालापलुक पुत्रकिंवाधर्मपुत्रम्हणतात. ‘पलुक पुत्राचीनेमणूक, पारसी व्यक्ती हयात असतांना केली जाते तरधर्मपुत्राचीनेमणूक पारसी व्यक्ती मयत झाल्यानंतर अंत्यविधी कार्य करण्यासाठी केली जाते.

दत्तक घेणार्‍या माता किंवा पित्याच्या मिळकतीत, दत्तक आपत्याला वारसा हक्क मिळत नाही. मृत्यूपत्रानुसार दत्तक आपत्याला काही मिळकत दिली जाऊ शकते. त्‍यामुळे पारसी धर्मातील तरतुदींनुसार तुम्‍हाला मयत जहांगिरच्‍या मिळकतीत हिस्‍सा मिळणार नाही.   


Comments

Archive

Contact Form

Send