पीकांची माहिती “ ई पीक पाहणी ” (E-Peek Pahani App) मोबाईल ॲपमध्ये कशी नोंदवावी ?

पीकांची माहिती “ ई पीक पाहणी ” (E-Peek Pahani App) मोबाईल ॲपमध्ये कशी नोंदवावी ? यासंदर्भात संपूर्ण महिती.

  • नमस्कार शेतकरी मित्रांनो,
    • शेतकरी/खातेदार यांनी गुगल प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यावर आपली नोंदणी करावी.
    • पीक पेरणीची माहिती या सदरामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा भुमापन क्र./स नं /गट क्रमांक निवडायचा आहे.
    • जसेही तुम्ही तुमच्या शेत जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमीनीचे एकूण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती या ठिकाणी आपोआप दर्शविली जाईल.
    • हंगाम निवडा यामध्ये शेतकरी सध्या खरीप किंवा संपूर्ण वर्ष या पैकी योग्य हंगाम निवडू शकतात.
    • पीक पेरणेसाठी (लावणीचे) उपलब्ध क्षेत्र हे या ठिकाणी आपोआप दर्शविले जाईल.
    • पिकांचा वर्ग या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील जसे की, निर्भेळ पिक म्हणजेच एक पिक पद्धती , मिश्र पिक म्हणजेच अनेक पिके पद्धती, पॉलीहाउस पिक, शेडनेटहाउस पिक, पड क्षेत्र या पैकी योग्य पर्याय या ठिकाणी निवडावा.
    • जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापुर्वी जमीनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करावे तसेच त्याक्षेत्रात असलेल्या जल सिंचनाचे साधनांची नमूद करता येईल त्या नंतर पेरणी / लागवड केलेल्या पिकाची माहिती नोंदवा.
    • पीकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भेळ पीकाचा प्रकार पीक व फळपीक हे दोन पर्याय दिसतील अशा वेळी योग्य तो पर्याय निवडावा.
    • पीक हा पर्याय निवड करुन शेतातील घेतलेल्या पीकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंद करावी फळपीक हा पर्याय निवडल्यास शेतामध्ये आंबा व इतर फळ पीक असल्यास ते निवड करुन झाडांची संख्या व क्षेत्र नमुद करता येईल.
    • मिश्र पीक निवडल्यानंतर तुमच्या शेतामध्ये एकाच वेळी त्याच क्षेत्रात जी पिके लावलेली आहेत आणि जेवढ्या क्षेत्रावर लावलेली आहेत व त्यांचे क्षेत्र या ठिकाणी भरावे .मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकाने व्यापलेल्या क्षेत्राचे प्रमाणात विभागून टाकावे. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्र पेक्षा जास्त होवू नये.
    • चालु हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पड क्षेत्र निवड करावे. चालू पड क्षेत्र त्या त्या हंगामा पुरते असते
    • जल सिंचनाचे साधन या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीवर टच करतातच सिंचनाचे अनेक साधने या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यापैकी तुमची तुमच्या पिकांना पाणी देण्यासाठी ज्या जल सिंचन साधनाचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडता येईल. हे साधन म्हणजे त्या त्या पिकासाठी चा जल श्रोत होय.
    • त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे जसे कि ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे सिंचन या पैकी एक पर्याय या ठिकाणी शेतकऱ्याने निवडणे अपेक्षित आहे.
    • शेतकरी या ठिकाणी पीक पेरणी केलेला/लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करतील.
Original Post by
रामदास जगताप सर
राज्य समन्वयक ई-पीक पाहणी प्रकल्प

Comments

Archive

Contact Form

Send