ई-पीक पाहणी” (E-Peek Pahani) मोबाईल ॲपमध्ये कायम पड व जलसिंचनाची साधने कशी नोंदवावीत ?

“ई-पीक पाहणी” (E-Peek Pahani) मोबाईल ॲपमध्ये कायम पड व जलसिंचनाची साधने कशी नोंदवावीत ? याबद्दल माहिती जाणून घ्या.

  • नमस्कार शेतकरी मित्रांनो,
    • जमीन क्षेत्रातील काही जमीन शेत कायम पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड करणे शक्य नसल्यास अशावेळी कायम पड क्षेत्र आगोदर भरणे आवश्यक आहे नाहीतर आगोदार पिकाखाली संपूर्ण क्षेत्र नमूद केल्या नंतर पड क्षेत्र नमूद करता येत नाही म्हणून ई पीक पाहणी स्तही प्रथम कायम पड क्षेत्रात लागवडीस उपलब्ध नसलेली जमीन जसे वस्ती पड, गोठापड, कांदाचाळ पड, घर पड, इत्यादी तसेच या क्षेत्रात प्रत्यक्ष असलेली जल सिंचनांची साधने जसे विहीर , बुडकी, विंधन विहीर / बोअरवेल पड / कुपनलिका पड /ओढा पड/ शेततळे पड इत्यादी नमूद करून त्यांचे पड क्षेत्र ( हे.आर.चौ.मी) नमूद करून साठवावे.
    • सामान्यत: ज्या खडकाळ, मुरमाड, माळरान , बिनशेती वापराचे क्षेत्र जसे वस्ती पड , घर पड , गोठा पड, इत्यादी असल्याने जमिनीवर कसलेही लाभदायी पीक निघू शकत नाही, अशा जमिनी यात मोडतात.
    • जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापुर्वी जमीनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करुनच त्या नंतर पेरणीची माहिती नोंदवा.
    • कायम पड मध्ये सदर क्षेत्रांचा फोटो न काढता देखील माहिती सध्या भरता येते.
    • याठिकाणी जलसिंचनाचे साधन क्षेत्रा सह उपलब्ध होईल.
    • कायम पड हि माहिती संपूर्ण वर्ष हा हंगाम निवडून एकदाच भरावी लागेल प्रत्येक हंगामात कायम पड क्षेत्र भरावे लागणार नाही.
Original Post by
रामदास जगताप सर
राज्य समन्वयक ई-पीक पाहणी प्रकल्प

Comments

Archive

Contact Form

Send