कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकतीची विक्री

 


३९. कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकतीची विक्री :

 

वाचा : मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० ; भारतीय मुद्रांक कायदा १९०८ ; कुलमुखत्यार पत्र कायदा १८८२.

 

सदाशिवराव शहरात रहात होते त्‍यामुळे त्‍यांनी गावात असणार्‍या स्‍वत:च्‍या मालकीच्‍या जमिनीच्‍या विक्रीचे अधिकार देऊन अजयच्‍या नावे फार पूर्वी कुलमुखात्यारपत्र करून दिले होते. अजयने सदाशिवरावांच्‍या गावात असणारी जमीन विक्रमला नुकतीच कुलमुखात्यारपत्राने विकली.

या व्‍यवहाराबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद केली आणि अजय व विक्रमला नोटीस बजावली. अजय आणि विक्रमाने समक्ष हजर राहून नोटीसबुकवर सही केली आणि मुदतीनंतर नोंद प्रमाणित करण्‍यात आली.

काही दिवसांनी सदाशिवरावांचा मुलगा गावात आला आणि त्‍याच्‍या वडिलांच्‍या जमीनीची चौकशी करु लागला तेव्‍हा त्‍याला अजयने ती जमीन नुकतीच विक्रमला कुलमुखात्यारपत्राने विकल्‍याचे कळले.

सदर व्‍यवहाराची तारीख बघता असा खुलासा झाला की, ज्‍या दिवशी अजय आणि विक्रमचा व्‍यवहार झाला होता, त्‍याच्‍या एक महिना आधी सदाशिवराव मयत झाले होते.

सदर व्‍यवहाराची नोटीस सदाशिवरावांना न बजावल्‍यामुळे तलाठी आणि मंडलअधिकारी दोघेही अडचणीत आले.

तहसिलदारांनी तलाठी आणि मंडलअधिकारी यांना समजावले की,     

काही ठिकाणी, कुलमुखत्यार पत्राद्वारे झालेल्या खरेदी अथवा विक्री व्यवहाराबाबत फक्त कुलमुखत्यारपत्रधारकाला नोटीस काढली जाते. ही बाब चुकीची आहे. कुलमुखत्यारपत्राद्वारे झालेल्या खरेदी अथवा विक्री व्यवहाराबाबत फक्त कुलमुखत्यार पत्रधारकाला नोटीस न काढता कुलमुखत्यारपत्रधारकासहकुलमुखत्यार पत्र करून देणारयालाही नोटीस काढणे आवश्यक आहे. ‘कुलमुखत्यारपत्र करून देणारनोटीस दिल्यावर हजर राहिल्यास सदर खरेदी किंवा विक्री व्यवहारास त्याची संमती असल्याबाबत त्याचा जबाब घेण्यात यावा. या प्रकारच्या सूचना दिनांक २४/१०/२००८ च्या शासन परिपत्रकातसुध्दा देण्यात आल्या आहेत. कधी कधीकुलमुखत्यारपत्र करून देणारहा शहरात राहणारा असतो. कुलमुखत्यारपत्रधारकाला दिलेले कुलमुखत्यारपत्र त्याने रद्द केलेले असते. त्याबाबत महसूल प्रशासनास माहिती नसते. असे रद्द केलेल्या कुलमुखत्यारपत्राद्वारे केले गेलेले व्यवहार भविष्यात कायदेशीर गुंतागुंत निर्माण करतात.  

मंडलअधिकारी यांनी अशा नोंदीबाबत निर्णय घेण्‍याआधी कुलमुखत्यारपत्र नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करावी, कुलमुखत्यारपत्रात मिळकत खरेदी किंवा विक्रीचे अधिकार त्या कुलमुखत्यारपत्रधारकास प्रदान केले आहेत काय याची खात्री करावी, ‘कुलमुखत्यारपत्र करून देणारयाला तसेच सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावली गेली आहे याची खात्री करावी. ‘कुलमुखत्यारपत्र करून देणारनोटीस दिल्यावर हजर राहिला असल्यास सदर खरेदी किंवा विक्री व्यवहारास त्याची संमती असल्याबाबत जबाब घेण्यात आला आहे याची खात्री करावी. ‘कुलमुखत्यारपत्र करून देणारनोटीस दिल्यावर हजर राहिला नसल्यास त्याला पुन्हा पत्र/नोटीस देऊन हजर ठेवावे व नंतरच नोंद प्रमाणित करावी.

Comments

Archive

Contact Form

Send